माहित नसलेले बाबासाहेब !!
बाबासाहेबांना फक्त दलितांचे कैवारी, घटनाकार, आरक्षण एवढ्यापुरते किती दिवस सीमित ठेवणार आहोत आपण ? बाबासाहेबांचे राष्ट्रनिर्मिती मधील मोलाचे योगदान आतातरी उजेडात आणूया , समजुद्या तमाम भारतवासियांना नव्या पिढीला त्यांच्या कामाची महती, त्यांचे अमुल्य योगदान… आता तरी !!
मुद्दा हा नाहीच मुळी कि आपल्याला काही माहित नाही वादाचा मुद्दा हा आहे कि आपल्याला संशोधन / वाचन करण्याची इच्छा नाही. आपल्याला सध्या अर्धाच इतिहास माहित आहे आणि अर्धा इतिहास आपण जाणून घेत नाही आहोत आणि म्हणून संपूर्ण इतिहासाचा अर्थच बदलून जातोय हे आपल्या लक्षात येत नाहीये.
पाण्याचे नियोजन, विद्युत उर्जा, धरणे आणि आर्थिक नियोजन वरील बाबासाहेबांचे कार्य :-
दामोदर नदी हि "बंगाल चे दुखः" म्हणून ओळखली जात असे, प्रत्येक वर्षी पूर स्थिती ला इथले लोक बळी पडत असे. अशा परिस्थितीत नदीच्या पत्रावर नियंत्रण करून पाण्याचा उपयोग जल विद्युत उर्जा, नौ संचालन, विद्युत प्रकल्प अशा विविधांगी प्रकल्पात करता यावा या करिता तत्कालीन मजूर मंत्री बाबासाहेबांना विचारणा झाली, बाबासाहेबांनी अभ्यास करून प्रकल्पांबद्दल आपले भाषण केले आणि सभागृहातील टाळ्यांचा आवाज खूप वेळ चालू राहिला होता. पाण्याच्या योग्य वाटप आणि पूर परिस्थिती टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावर नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी सुचवला होता परंतु कावेरी नदीच्या पत्रावारीन कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात राजकीय तेढ निर्माण झाला होता.
सर्वसामान्यपणे विद्युत उर्जा प्रकल्प किंवा दरी खोऱ्यान मधील जल प्रकल्प पंडित नेहरू आणि गांधी यांच्या नावाने सांगितली जातात पण बाबासाहेबांचे त्यातील महत्वाचे कार्य सांगितले जात नाही मजूर मंत्रालायाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्युत उर्जा आणि सिंचन प्रकल्पांच्या प्रगती साठी नियम बनवणे आणि नियोजन करणे हे सर्वात महत्वाचे आणि प्रथम काम होते. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मजूर खात्याने "केंद्रीय तांत्रिक उर्जा समिती " स्थापन करण्याचा निर्णय घेतला (central technical power board), त्याद्वारे जल उर्जा निर्मिती , जल विद्युत सर्वेक्षण,विद्युत निर्मिती समस्या निराकरण, औष्णिक उर्जा प्रकल्प अन्वेषण कामे पार पडता आली.
विविध नदीच्या जलाशयांचा एकत्रित साठा करून सिंचन आणि विद्युत प्रकल्प आणि इतर प्रकल्पांसाठी वापर करता यावा म्हणून १९३० पासून भारतात जल विज्ञान अभियांत्रिकी कामावर जास्त भर दिला गेला आणि याचे संपूर्ण श्रेय सिंचन आणि उर्जा खात्याला जाते ज्याचे मुख्य होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, या क्षेत्रातील भविष्यातील गरज ओळखून त्या वेळी असलेले तांत्रिक शिक्षण किंवा तज्ञ मनुष्यबळ कमी पडेल याची बाबासाहेबांना खात्री होती म्हणून बाबासाहेबांनी १९४४ साली "केंद्रीय जलमार्ग आणि सिंचन आयोगाची " शिफारस करून नियुक्ती केली.
बाबासाहेबांमुळे सिंचन, जल संवर्धन आणि उर्जा क्षेत्रात एक मजबूत तांत्रिक व्यवस्थापन बनण्यास मोलाची मदत झाली.आज आपली घरे उजेडात आहेत आणि शेती हिरवीगार आहे तर ती फक्त बाबासाहेबांच्या मेहनतीमुळे, बाबासाहेबांच्या या प्रकल्पामधील उत्तम नियोजनावर भारताची अर्धी अधिक अर्थ व्यवस्था निर्भर आहे आणि यशस्वी आहे.
आज भारतातील कुठलेही जल विद्युत प्रकल्प आहेत ते बाबासाहेबांच्या अभ्यास, नेतृत्व आणि नियोजनामुळे आहेत. बाबासाहेबांनी मुख्यत जल वितरण आणि विद्युत उर्जा वितरणावर भर दिला( GRID SYSTEM ) जी आज सुद्धा यशस्वीपने सुरु आहे. आज आपले भारतीय विद्यार्थी तंत्र शिक्षणासाठी विदेशात जात आहेत तर ते श्रेय सुद्धा बाबासाहेबांना द्यावे लागेल कारण तरुणांना उच्च तंत्र शिक्षण प्रशिक्षणा साठी विदेशी पाठवण्याची तरतूद बाबासाहेबांनी केली होती आणी अजूनही हि POLICY आहे.
दामोदर नदी प्रकल्प हा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला यशस्वी आणि पहिला प्रकल्प त्यानंतर भाक्रा नांगल, महानदी, सोने आणि तुंगभद्रा नदी वरील प्रकल्प बांधण्यात यश आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर "उर्जा खाते " बनवण्यात आले ,भारताने फक्त उर्जा निर्मिती वर भर न देता स्वस्त उर्जा कशी बनवता येईल आणि जनतेला पुरवता येईल याचे बाबासाहेबांनी समर्थन केले. त्यांनी अंतरराज्य उर्जा संचार जाल असावे यावर सतत भर दिला जो आजच्या पवारग्रीड या कंपनी चा पाया ठरला.
बाबासाहेबांचे आर्थिक नियोजन आणी विकास हे उर्जा क्षेत्रात फार महत्वाचे पाउल ठरले आणि ते खरया अर्थाने भारताच्या आर्थिक नियोजनाचे आणि विकासाचे जनक ठरले
बाबासाहेबांच्या या क्षेत्रातील कामाबद्दल खूप सांगता येईल परंतु तूर्तास वाचकांना संशोधनाची चालना मिळावी या करिता इतके पुरे आहे , संशोधन करून इतर माहिती या लेखात जोडावी किंवा प्रतिक्रियेत मांडवी
ll जय हिंद जय महाराष्ट्र ll
नोट- हा लेखं जास्तीत-जास्त शेअर करा.
-----------------------------------------------------------------
लेखं- अमोल गायकवाड Amol Gaikwad (Facebook Page- प्रबोधन- जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया)
संदर्भ -
१) GEOGRAPHICAL THOUGHT OF DR .B.R. AMBEDKAR - दीपक महादेव राव वानखेडे
२) From Powerless Village to Union Power Secretary: Memoirs of an IAS
Officer - प्रथीपती अब्राहम