लिंगायत धर्मातील धनगर समाज-
धूळदेव कोळेकर
लिंगायत धर्म धनगरांचा बनलेला आहे. लिंगायत धर्म हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडी तालुक्यात कम्मेकुळ या गावात इ.स. ११३४ मध्ये जन्मलेल्या महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात या धर्माची स्थापना केली.
"कायकवे कैलास" म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार त्यांनी मांडला. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यानी लिंगायत धर्माची स्थापना केली. या धर्म स्थापनेत त्यांना बहुसंख्येने धनगर समाजाने साथ दिली. आजही भारतातील अनेक राज्यात लिंगायत धनगर समाज आहे.