Friday, 2 December 2011

महाबळेश्वर हे मुळचे महाबळे आडनावाच्या धनगर समाजाचे -


                                                                                      



 महाबळेश्वर हे मुळचे महाबळे आडनावाच्या धनगर समाजाचे -
महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण म्हणून क्षेत्र महाबळेश्वर प्रसिद्द आहे, गावाचे मूळ नाव महाबळेश्वर हे महाबळे या धनगर आडनावाचे होते, महाबळे या आडनावाचा धनगर समाज हा मुळचा महाबेश्वरचा . नंतर इथे इतर धनगर समाज पण वसला ती आडनावे आहेत ढेबे,आखाडे,हिरवे.तसेच या समाजाची डोंगर रानाला शेती पण खूप मोठ्या प्रमाणात आहे.हि लोके प्रमुक्याने स्टॅनबेरीज, रासबेरीज ची लागवड करतात, आणि जेम च्या कारखान्यांना पुरवठा करतात.

इतिहास- इ.स १२१५ मध्ये सिंघन या देवगिरीच्या यादव राजाने कृष्णा नदीच्या उगमाजवळ एक मंदिर आणि पाणी पिण्याचे जलकुंड बांधले. तसेच या परिसराच्या जवळ प्रतापगड हा प्रेक्षणीय किल्ला आहे. 

नंतर च्या काळात येथील वातावरण आणि निसर्ग श्रुष्टी पाहून ब्रिटीश सरकारने याला हिल स्टेशन चा दर्जा दिला,

येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते.सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
महाबळेश्वराच्या मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.

विठ्ठल खोत 

No comments:

Post a Comment