बैलाने
आपल्या धन्याचा जीव वाचवला -
तसे
पाहिले तर वाघ किव्हा बिबट्याने जर एखादे जनावर शेळी,मेंढी अथवा वासरू मारले तर त्या
पशुपालकाला वनखात्या तर्फे विशिष्ठ रक्कम किव्हा त्या जनावराचा बाजार भाव देण्यात
येतो. कारण वाघ पण शेवटी शिकारी प्राणी असल्याकारणे त्याला शिकार लागणार हे
नैसर्गिक आहे. वनखात्याने पण काही प्रमाणात हरणे आणि तत्सम प्राणी सोडलेले आहेत.
परंतु थोडे नुकसान शासनाला सोसावे लागते. कारण वाघ हा आपला राष्ट्रीय पशु असून
त्यांच्या संख्येमध्ये विलक्षण घट काही दशकात दिसून आली आहे.
हे
चित्रपटातील अथवा एका रंजक पुस्तकातील हा प्रसंग नसून हि वास्तवात घडलेली
महाराष्ट्रातील घटना आहे.एक वास्तवदर्शी लघुपट Discovery चेनल वर पाहिला. अर्थात तो
महाराष्ट्रातील वाग्र्य अरण्या नजीकच्या गावातील होता. एक पशुपालक आपली गुरे घेवून
रानात चारावयास घेवून गेला होता. गावापासून रानात अगदी ४ ते ५ किलोमीटर आत मध्ये
हा गुराखी आपली गुरे चारीत होता. विशेष म्हणजे त्याला हे माहित नव्हते कि एक वाघ
त्याचा पाठलाग करत होता. वाघ हा प्रामुख्याने एकटा शिकार करतो इतर मौसाहारी
प्राण्याप्रमाणे हा नाही. परंतु या वेळी हा पाळीव पशून पेक्षा त्या गुराख्याची
शिकार करायची होती. वाघाने गुरख्यावर झेप घेतली. त्याक्षणी गुरांच्या कळपातील
बैलांनी हे पाहिले. आणि आपल्या धन्याचा जीव संकटात आहे हे कळताच एका बैलाने वाघावर
धावून गेला. हे पाहून इतर जनावरे पण सरसावली. वाघाला काही कळेनासे झाले. बैलाने
वाघांना धडक मारली. वाघाने तिथून तूर्तास पळ काढला. नंतर जखमी गुराखी जनावरांच्या
कळपाच्या बरोबर मध्ये गेला. जनावरांनी
पण त्या गुराख्याच्या भोवती सुरक्षा घेरा बनवला आणि नंतर तो गुराखी सुखरूप आपल्या
घरी पोचला.
जर
गुराखी त्या दिवशी आपले बैल न नेता फक्त गाई आणि म्हैशी घेवून गेला असता तर कदाचित
त्याला त्याचे प्राण गमवावे लागले असते. कारण घाटावरतरी पाळीव पशून बरोबर बहुधा
बैल चारावयास नेत नाहीत. कारण ते प्रचंड आक्रमक असतात. आणि मालकाशिवाय त्यांना
इतरांचा आदेश स्वीकारत नाहीत आणि इतर पशून बरोबर उगाचच जुन्जतात (भांडतात) वगेरे.
हि
कहाणी आहे धन्यावर असलेलेल्या प्रेमाची. आणि जनावरे पण आपल्या मालकावर जीव लावतात
त्यासाठी प्राणाची परवा करत नाहीत. याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. आता जरूर बैलाची
जागा यंत्रांनी घेतली. परंतु बैलाचे आणि धन्याच्या नात्याची जागा कोणी घेवू शकत
नाही.
विठ्ठल
खोत
*************************************************
मी
जातीने गवळी-धनगर असल्यामुळे आमच्या गावच्या घरी गुरे- डोरे मुबलक प्रमाणात होती.
आमच्या घरामध्ये जनावरांसाठी गोठा असतो. आता जसे गुरांसाठी वेगळी जागा असते तशी
त्याकाळी आमच्याकडे नव्हती.
माझ्या
घरातील पण एक घटना मला वडील सांगतात कि - ते फक्त ६ महिन्याचे होते आणि ते रात्री
सरकत सरकत आमच्या बैलाच्या समोर वैरनीच्या (गवताच्या)जागेमध्ये जावून पडले. मऊ गवत
असल्याने कदाचित वडिलांची जोप लागली. माझी
आजी पहाटे उठली आणि पाहते तर काय वडिलांची गाढ जोप लागलेली होती. आणि बैलाने त्या
वडिलांना कोणतीच इजा केलेली नव्हती. त्यावेळी घरातील सर्व जन भारावून गेली होती.
माझ्या आजोबांनी त्या बैलाला मिठी मारली. नंतर फक्त सर्वांनी त्याच्यावर प्रेमंच केले.
अर्थात
तो बैल पूर्वी पासून आद्याधारक होताच. परंतु नंतर कधी त्याला तापाटन्याने
(चाबकाने) कोणीच मारले नाही. शेत नांगरताना नुसत्या आवाजावर तो क्रिया करत असे.
विठ्ठल
खोत.
No comments:
Post a Comment