Sunday, 11 November 2012

कांगारू-


                                                                           कांगारू-
केनसर च्या उपचारासाठी कांगारू प्राण्याचा खूप उपयोग होवू शकतो असे जीवशास्त्राद्यांना वाटत आहे. कारण कांगारू आपला ब्रून विकास ११ महिने थांबवू शकतो. हे केनसर रुग्णांच्या पेशिशीची अमर्याद वाढ रोखण्यास याची मदत करू शकते.आणि तसे संशोधन पण सुरु आहे. कांगारू आणि आपले पूर्वज १५ कोटी वर्षापूर्वी एकच होते असे जीवशास्त्राद्यांचे ठाम मत आहे.

भारतीय लोकांना कांगारू हा प्राणी प्रथम दर्शनी अतिशय शांत अगदी हरणा सारखा वाटेल. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. प्रौढ कांगारू त्याच्या एका लाथाप्रहारामध्ये माणसाचे प्राण घेवू शकतो. शिवाय त्याच्या हाताच्या बोटाना तीक्ष्ण नख्या असतात. त्याही खूप घातक असतात. परंतु हा प्राणी शाकाहारी असल्यामुळे आत्मरक्षणासाठी किव्हा आपल्या पिलांच्या रक्षणासाठीच हा प्राणी हल्ला करतो.

विठ्ठल खोत



बैलाने आपल्या धन्याचा जीव वाचवला -



बैलाने आपल्या धन्याचा जीव वाचवला -

तसे पाहिले तर वाघ किव्हा बिबट्याने जर एखादे जनावर शेळी,मेंढी अथवा वासरू मारले तर त्या पशुपालकाला वनखात्या तर्फे विशिष्ठ रक्कम किव्हा त्या जनावराचा बाजार भाव देण्यात येतो. कारण वाघ पण शेवटी शिकारी प्राणी असल्याकारणे त्याला शिकार लागणार हे नैसर्गिक आहे. वनखात्याने पण काही प्रमाणात हरणे आणि तत्सम प्राणी सोडलेले आहेत. परंतु थोडे नुकसान शासनाला सोसावे लागते. कारण वाघ हा आपला राष्ट्रीय पशु असून त्यांच्या संख्येमध्ये विलक्षण घट काही दशकात दिसून आली आहे.

हे चित्रपटातील अथवा एका रंजक पुस्तकातील हा प्रसंग नसून हि वास्तवात घडलेली महाराष्ट्रातील घटना आहे.एक वास्तवदर्शी लघुपट Discovery चेनल वर पाहिला. अर्थात तो महाराष्ट्रातील वाग्र्य अरण्या नजीकच्या गावातील होता. एक पशुपालक आपली गुरे घेवून रानात चारावयास घेवून गेला होता. गावापासून रानात अगदी ४ ते ५ किलोमीटर आत मध्ये हा गुराखी आपली गुरे चारीत होता. विशेष म्हणजे त्याला हे माहित नव्हते कि एक वाघ त्याचा पाठलाग करत होता. वाघ हा प्रामुख्याने एकटा शिकार करतो इतर मौसाहारी प्राण्याप्रमाणे हा नाही. परंतु या वेळी हा पाळीव पशून पेक्षा त्या गुराख्याची शिकार करायची होती. वाघाने गुरख्यावर झेप घेतली. त्याक्षणी गुरांच्या कळपातील बैलांनी हे पाहिले. आणि आपल्या धन्याचा जीव संकटात आहे हे कळताच एका बैलाने वाघावर धावून गेला. हे पाहून इतर जनावरे पण सरसावली. वाघाला काही कळेनासे झाले. बैलाने वाघांना धडक मारली. वाघाने तिथून तूर्तास पळ काढला. नंतर जखमी गुराखी जनावरांच्या कळपाच्या    बरोबर मध्ये गेला. जनावरांनी पण त्या गुराख्याच्या भोवती सुरक्षा घेरा बनवला आणि नंतर तो गुराखी सुखरूप आपल्या घरी पोचला.

जर गुराखी त्या दिवशी आपले बैल न नेता फक्त गाई आणि म्हैशी घेवून गेला असता तर कदाचित त्याला त्याचे प्राण गमवावे लागले असते. कारण घाटावरतरी पाळीव पशून बरोबर बहुधा बैल चारावयास नेत नाहीत. कारण ते प्रचंड आक्रमक असतात. आणि मालकाशिवाय त्यांना इतरांचा आदेश स्वीकारत नाहीत आणि इतर पशून बरोबर उगाचच जुन्जतात (भांडतात) वगेरे.

हि कहाणी आहे धन्यावर असलेलेल्या प्रेमाची. आणि जनावरे पण आपल्या मालकावर जीव लावतात त्यासाठी प्राणाची परवा करत नाहीत. याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. आता जरूर बैलाची जागा यंत्रांनी घेतली. परंतु बैलाचे आणि धन्याच्या नात्याची जागा कोणी घेवू शकत नाही.

विठ्ठल खोत

*************************************************

मी जातीने गवळी-धनगर असल्यामुळे आमच्या गावच्या घरी गुरे- डोरे मुबलक प्रमाणात होती. आमच्या घरामध्ये जनावरांसाठी गोठा असतो. आता जसे गुरांसाठी वेगळी जागा असते तशी त्याकाळी आमच्याकडे नव्हती.

माझ्या घरातील पण एक घटना मला वडील सांगतात कि - ते फक्त ६ महिन्याचे होते आणि ते रात्री सरकत सरकत आमच्या बैलाच्या समोर वैरनीच्या (गवताच्या)जागेमध्ये जावून पडले. मऊ गवत असल्याने कदाचित वडिलांची जोप लागली. माझी आजी पहाटे उठली आणि पाहते तर काय वडिलांची गाढ जोप लागलेली होती. आणि बैलाने त्या वडिलांना कोणतीच इजा केलेली नव्हती. त्यावेळी घरातील सर्व जन भारावून गेली होती. माझ्या आजोबांनी त्या बैलाला मिठी मारली. नंतर फक्त सर्वांनी त्याच्यावर प्रेमंच केले.  

अर्थात तो बैल पूर्वी पासून आद्याधारक होताच. परंतु नंतर कधी त्याला तापाटन्याने (चाबकाने) कोणीच मारले नाही. शेत नांगरताना नुसत्या आवाजावर तो क्रिया करत असे.

विठ्ठल खोत.





Saturday, 15 September 2012

मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास





मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास!

-संजय सोनवणी

मीठ हा आज सर्वांना अतिपरिचयामुळे अत्यंत सामान्य वाटणारा पदार्थ...पण मीठाखेरीज माणुस जगू शकत नाही...त्यामुळेच मीठाचा शोध हा मानवी संस्क्रुतीतील सर्वात महत्वाचा क्रांतीकारी टप्पा मानला जातो. मनुष्य लाखो वर्षांपुर्वी जेंव्हा शिकारी मानव होता त्या काळात शरीरातील मीठाची गरज भागवण्यासाठी तो शिकार केलेल्या प्राण्याचे प्रथम रक्त पिवून शरीरातील मीठाची गरज भागवत असे अथवा लवणयुक्त माती खात असे. पुढे उपलब्ध असेल तेथील खनीज मीठ (सैंधव) वापरात आणले गेले. अशा मीठाच्या नैसर्गिक खाणी मुळात कमी असल्याने अर्थात ते प्रचंड महाग असे. एके काळी सोन्यापेक्षाही अधिक किंमत मीठाला मिळत असे. मीठामुळे जगात अनेक युद्धे झालेली आहेत. साम्राज्ये बनली आहेत गडगडली आहेत. जगातील सर्वात प्राचीन व्यापार हा मीठाचा होता. मीठ उपलब्ध असलेल्या प्रदेशांवर स्वामित्व स्थापित करण्यासाठी घनघोर युद्धे होत असत. आपल्याला आता सिल्क रुट्स माहित आहेत, पण जगातील व्यापारी मार्ग प्रचीन काळी साल्ट रुट्स (मीठमार्ग) म्हणुन ओळखले जात. रोममद्धे तर सैनिकांना पगार मीठाच्या रुपातच दिला जात असे, त्यामुळेच आजचा स्यलरी (salary) हा शब्दही मुळच्या salt पासुन तयार झाला आहे. मीठाने खाद्य संस्क्रुतीत क्रांती तर घडवलीच पण मानवी आरोग्यही सुद्रुढ व्हायला मोलाची मदत झाली. ज्याचे मीठ खाल्ले आहे त्याच्याशी बेईमानी करणे हा नैतीक गुन्हा मानला जावू लागला, एवढे मीठाचे सांस्क्रुतीक महत्व वाढले. धर्मकार्यातही मीठ हा महत्वाचा घटक बनला. इतकेच नव्हे तर भुता-खेतांना, अभद्र प्रकारांना टाळण्यासाठीच्या तांत्रिक विधींमद्धेही मीठाला महत्वाचे स्थान मिळाले. मीठामुळे मांस-मासे ते नाशवंत पदार्थ टिकवण्यासाठी मोलाची मदत झली. म्रुतांचे ममीफिकेशन करत प्रदिर्घकाळ शरीररुपाने टिकवण्यासाठीही मीठाचा उपयोग झाला. एका अर्थाने मानवी संस्क्रुती ही मीठाच्या शोधामुळे आमुलाग्र बदलली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

मीठ हा नेहमीच जागतीक राजकीय इतिहास व्यापुन राहिला आहे. इंग्रज सरकारला हादरवून सोडनारा भारतातील महात्मा गांधींचा मीठाचा सत्याग्रह कोण विसरेल? मीठावर कर बसवला म्हणुनच! मीठ हे मानवी संस्क्रुतीच्या अत्यंत प्राथमिक काळात कर बसवले गेलेले एकमेव उत्पादन आहे. मीठांच्या खानींवर व मीठागरांवर देखरेख करायला "लवणाध्यक्षा" ची नेमनुक कशी करावी याबाबत कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही निर्देष आहेत. चीनमद्धे इसपुच्या तिस-या सहस्त्रकातील मीठावरील व्यापार, कर, मीठाचे प्रकार याबाबत सर्वात प्राचीन लेख मिळतो. याचे कारण म्हणजे मीठ हे त्या काळात गरजेपेक्षा कमी उपलब्ध होते आणि ज्याचे मीठावर स्वामित्व त्याचे साम्राज्य अशी परिस्थिती होती.

भारतात फार पुर्वी हिमालयाच्या भागात नैसर्गिक खानींतुन मिळनारे मीठ तेवढे माहित होते. पुढे समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवायचा शोध इसपुच्या ५००० वर्षापुर्वी लागला असे गुजरातेतील ढोलवीरा येथे झालेल्या उत्खननातुन दिसते. समुद्राच्या (सिंधु) पाण्यापासुन निर्माण केले गेले ते सैंधव असे असंख्य उल्लेख आपल्याला आपल्या पुरातन साहित्यांतुन आढळतात. अर्थात समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवण्याचा शोध मत्स्यमारी करणा-या लोकांनीच लावला. जमीनीवर आलेले समुद्राचे खारे पाणी वाळले कि मीठाची स्फटिके मिळतात आणि ते खाद्यसंस्क्रुतीत उपयुक्त ठरते हे निरिक्षण कामी आले आणि मीठाचीच शेती करण्याची पद्धत शोधली गेली.

भारतात मीठाचा अमोलिक, सर्व मानवी जीवनाला आवश्यक आणि उपकारक असा शोध कोलीय समाजाने लावला. सर्वप्रथम हा शोध लागला तो कच्छ प्रांतात, मग हळु हळु जेथे जेथे अनुकुल किनारे व वातावरण होते तेथे हा मीठशेतीचा उद्योग विस्तारत गेला. कोळी समाजातील जी कुटुंबे मीठशेतीकडे वळाली त्यातुनच आगरी समाजाचा उदय झाला. आगर या प्राक्रुत शब्दाचा सरळ अर्थ आहे बाग वा शेत. नारळी-पोफळींच्या बागांबरोबरच जेथे मीठ "पिकवले" जात होते त्याला अर्थातच मीठाची बाग... मीठागर म्हटले जाणे स्वाभाविक होते. या आगर शब्दातुनच "आगरी" या शब्दाचा उगम झाला असल्याचे स्पष्ट दिसते. याचाच दुसरा अर्थ असा कि कोळी व आगरी हे मुळचे एकच! कोळी व आगरींचे मुळचे ऐक्य सांगणारी एक पुराणकथाही येते. अगस्ती मुनीच्या आंगले आणि मांगले या दोन पुत्रांपासुन क्रमश: आगरी आणि कोळी समाज निर्माण झाले अशी ही कथा सांगते. त्यातील पुराणकारांचा मित्थकथा बनवण्याचा हव्यास सोडला तरी हे दोन समाज आधी एकाकार होते हे पुराणकारालाही माहित होते हे स्पष्ट होते अणि ते खरेही आहे.

कोळी समाज देशभर आढळतो. या समाजाचेही मुळ रुप काय हेही येथे पाहणे आवश्यक आहे. या समाजाचे मुळ हे "कोलीय" या भारतातील अतिप्राचीन अशा मानवगणाकडे जाते. भारतात प्राचीन कालापासुन अनेक मानव गण वावरत होते, त्यापैकी हा एक. हा पुरातन मानवी घटक देशभर विखुरलेला होता, भारतात कोलीय (कोलीयक) नांवाची अनेक गांवे नेपाळ, राजस्थान, झारखंड, ओरीसा ते केरळ-तमिळनाडुपर्यंत आढळतात व ती त्यांच्या देशव्यापी अस्तित्वाची कल्पना देतात. कोलीय हे फक्त मत्स्यमार नसुन ते वीणकर ते क्रुषिकार्यही करणारे होते. त्यातील समुद्रकिनारी वसलेल्यांनी सागरी मत्सोद्योगही होवू शकतो याचा अंदाज घेत पहिल्या नौका बांधल्या व सागरी मासेमारी सुरु केली. जाळ्यांचा शोध त्यांना उपयुक्त ठरला कारण ते कुशल वीणकरही होते. हे शोध त्यांच्या अन्नाच्या, भरणपोषणाच्या निकडीमुळेच लागले. पुढे काही शतकांतच प्रत्यक्षानुभवामुळे समुद्राच्या खारट पाण्यापासुन मीठाचे उत्पदन होवू शकते हा शोध लागला. या शोधांतुन नव्य अन्नोद्योग तर सुरु झालाच, पण त्यांच्याच नौकाशास्त्रातुन पुढे विदेश व्यापार सुरु झाला. अर्थात प्राथमिक निर्यात होणारे उत्पादन होते ते म्हनजे मीठ व खारवले गेलेले मांसान्न. पुढे त्यातुन बलाढ्य अशी भारतीय आरमारे सुद्धा उभी राहिली. मुळात हा समाज दर्यावर्दी असल्याने नौकानयनाच्या शोधाचे श्रेयही याच समाजाला द्यावे लागते. नौकानयनामुळे नुसते मीठच नव्हे तर अन्यही उत्पादने निर्यात होवू शकत होती. भारतात दहाव्या शतकापर्यंत जी सम्रुद्धी दिसते त्याचे मुलकारण या नौकानयनात साधल्या गेलेल्या प्रगतीत आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

सह्याद्रीच्या कड्यांतुन जे घाट निर्माण केले गेले ते पुरातन मीठमार्गच होते. वंजारी समाज या मार्गांनी मुख्यत्वाने मीठच जनावरांवर लादुन घाटावरील मीठाचे दुर्भिक्ष असणा-या प्रदेशात भटकत रहात मीठ पुरवत असत. या समाजाचाचेही भारतीय संस्क्रुतीला महान योगदान आहे.

सिंधु संस्क्रुतीपासुनच (इसपु ४२००) भारताचा जागतीक व्यापार सुरु झाला होता. लोथल या क्रुत्रीम बंदराची सिंधुकाळातील पुरातन निर्मिती हा कोलीय समाजाने निर्माण केलेला आश्चर्याचा अद्भुत असा नमुना आहे. कोकणातली चेउल सारखी अनेक प्राचीन बंदरे (इसपु २२३) आजही या समाजाच्या सागरव्यापाराची आणि विजिगिषु व्रुत्तीची साक्ष देतात. इजिप्त, सुमेर, अरबस्तान व अन्य युरोपीय देशांशी त्यांचा व्यापार होत होता. मीठ हे अर्थातच महत्वाचे उत्पादन होते व त्याच बरोबर अन्य भारतीय वस्तुही आपसुक निर्यात होवू शकल्या. यामागे कोळी-आग-यांची अपार कल्पकता होती. साहस होते. भारतातुन सोण्याचा धुर निघत होता असे आपण मानतो, जे सत्यही आहे, पण जर मुळात हे शोध लावलेच गेले नसते तर?

कोकणातील आरंभीच्या सत्ता याच समाजाच्या होत्या. कुडा-मांदाड येथील लेण्यातील शीलालेखात तत्कालीन स्थानिक सत्ताधा-यांचा उल्लेख येतो. ते आगरी कोळीच आहेत. इसवीच्या सहाव्या शतकात तर आगरी-कोळी आणि महार (महारक्ख) यांची कोकणावर संयुक्त सत्ता होती. (संदर्भ: बोंबे प्रेसिडेन्सी ग्यझेट-कोलाबा जिल्हा आणि एच. डी. सांकलिया) किंबहुना नंतरच्याही सत्ता यांच्या मदतीखेरीज या भुभागावर राज्यच करु शकल्या नाहीत असेच इतिहास सांगतो.

सातवाहन काळापासुन (इसपु २२०) महाराष्ट्राचे लष्करी आरमारही बलाढ्य बनल्याचे दिसते. यात खरा हातभार कोळी-आगरी लोकांचाच होता. हे आरमार एवढे बलाढ्य होते कि सातवाहनांनी आगरी-कोळी बांधवांच्या मदतीने श्रीलंकेचाही पराभव करत तेथवर सत्ता पोहोचवली. एवढेच नव्हे तर सातवाहनकालीन व आजच्या मराठीचे मुळ असलेल्या माहाराष्ट्री प्राक्रुताच्या मुळ रुपाला आगरी बांधवांनी आपल्या आगरी भाषेत कटाक्षाने जपलेले दिसते.

वैदिकांनी जरी पुढे सिंधुबंदी नामक अत्यंत अनिष्ट प्रकरण पुढे आणले असले तरी नौकानयन या समाजाने सुरुच ठेवलेले दिसते. त्याचाच उपयोग सोळाव्या शतकात छ. शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आरमार उभारायला झाला. याचा दुसरा अर्थ असा कि हा समाज वैदिक संस्क्रुतीच्या प्रभावात कधीच आला नाही. त्यांनी समुद्रबंदीचा फतवा मान्य केला नाही. पुढे सरखेल कान्होजी आंग-यांच्या रुपाने इतिहासाला एक महानायक मिळाला. आगरी-कोळी समाजाचे आरमारी युद्धतंत्र त्यांच्या काळात कळसाला पोहोचले. समुद्राचीच संगत पुरातन कालापासुन असल्याने सागरी किल्ल्यांची संकल्पनाही याच समाजाने खुप आधी विकसीत केली होतीच. हे आधीचे सागरी किल्ले बनवले गेले ते सागरी चाच्यांना तोंड देण्यासाठी व व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यांचा उपयोग स्वराज्याला केवढा झाला हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. आजच्या सर्वच सागरी किल्ल्यांच्या निर्मितीचे खरे श्रेय आगरी-कोळी समाजालाच द्यावे लागते ते यामुळेच. पण पुढे नानासाहेब पेशव्याने आंग्र्यांचे आरमार बुडवण्याची घोडचुक केली आणि इंग्रज-पोर्तुगीजांना मोकळे रान मिळाले हा दुर्दैवी इतिहासही येथे विसरता येत नाही.

कोळी हे कोलीय या गणाचे लोक. हे कोलीय कोण होते, याचाही विचार येथे करायला हवा. कोलीय वंश जरी भगवान बुद्धांमुळे आज माहित असला तरी त्या वंशगटाचा उगम हा सिंधुपुर्व संस्क्रुतीतच आढळतो. व्यास-वाल्मिकी हे आद्य महाकवी याच कोलीय समाजाने दिले हेही येथे आवर्जुन नमुद करुन ठेवतो. सिंधुकालीन नौका (ज्या तशाच प्रकारे आजही सिंध प्रांतात बनतात) बनवण्याची रीत या कोलीय लोकांनीच शोधली. कोलीय वंश हा मुळचा शैव मात्रुसत्ताक पद्धती पाळनारा समाज होय. त्यांची स्वतंत्र गणराज्ये होती व ती त्यांच्या वंशाच्या नांवानेच ओळखली जात असत. मुळचे कोलीयच असल्याने व विशिष्ट भागांतच एकवटल्याने पुरातन मात्रुसत्ताक पद्धतीचे अंश आजही आगरी समाजाने जतन केले आहेत. अन्य समाजगटांपेक्षा वैदिक संस्क्रुतीचा पगडा दूर ठेवण्यात त्यांना यश आले ते त्यामुळेच! त्यांच्या देवता प्रामुख्याने मात्रुदेवताच असून (उदा. एकवीरा, मंबाई, गोराई, इ.) त्यांच्यात हुंडा देणे-घेणे पुर्णतया अमान्य आहे. एवढेच नव्हे तर समाजाची पंचायत ही फक्त देवीमंदिरासमोरच भरते. घरातील आर्थिक व्यवहार हे आजही सर्वस्वी स्त्रीयांच्याच हाती असतात. गणसत्ताक पद्धतीचेही त्यांनी अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपलेले वैशिष्ट्य असे कि आगरी खेड्यांत आगरी सोडुन अन्य माणुस औषधालाही सापडत नसे. आगरी पंचायतच सामाजिक निर्णय एकत्रीतपणे घेत असे. बाह्य सत्तांना त्यात जवळपास प्रवेशच नव्हता.

कोलीय लोक हे "कोल" या मानवीवंशगटचे आहेत असे मानववंशशास्त्रद्न्यांचे मत आहे. हा मानवी गट भारताबाहेरही आढळतो. कोकनात या मानवी गटाचे आगमन इसपू ७ ते ८ हजार वर्षांपुर्वी झाले असावे असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. नदी-तळी येथील मासेमारी मानवाला पुरा-पाषाणयुगापासुन येत होती. पण समुद्रातील मासेमारी अत्यंत धाडसाची अशीच होती. ज्या कोलीय गणाने सामुद्रिक मासेमारीचा शोध लावला व अन्नाची गरज भागवु लागला तो सागरकिनारे हेच आपल्या वास्तव्याचे ठिकान ठरवणार हे उघड आहे. पुढे तोही उद्योग बनला. आणि मीठाचा शोध लागल्यानंतर जो भाग मीठशेतीस योग्य आहे तेथेच त्यांची वस्ती आढळणे स्वाभाविक असेच आहे. त्यामुळेच कि काय महाराष्ट्रात व गुजराथेतही (जेथेही मीठशेती करता येणे शक्य होते तेथे) त्यांच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरातत्वीय पुरावे आढळतात आणि तेथेच ते आजही एकवटलेले दिसतात. त्यामुळे महिकावतीच्या बखरीतील आगरी समाज हा बिंबराजाबरोबर मुंगी-पैठणवरुन आठशे वर्षांपुर्वी कोकनात आला ही कथा आपोआपच बाद होते. कारण मीठ बनवणे हा आगरी समाजाचा पुरातन कालापासुनचा व्यवसाय होता. बिंब राजाने कोकणात आक्रमण केल्यानंतर त्यांना सैनिक म्हणुन गरज संपल्यानंतर मीठागरे बनवून दिली व तेच आगरी हे मत कोणत्याही पुराव्यांवर टिकत नाही. ते मानले तर मीठाचा शोध तेराव्या शतकात बिंबराजाने लावला असे म्हनावे लागेल!

महत्वाचे म्हनजे तथागत गौतम बुद्धाची माता महामाया व पत्नी यशोधरा हीसुद्धा कोलीय वंशाची होती. कदाचित त्यामुळेच कि काय इतिहासात असे दिसते कि कोकणातील कोळी-आगरी लोकांवरही बुद्ध धर्माचा प्रभाव होता. कोकणात बुद्ध धर्माचे अस्तित्व प्रबळ असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. नालासोपारा अथवा कुडे-नांदाडची बौद्ध लेणी ही आगरी समाजाचे प्राबल्य असना-या भागातच आहेत हेही स्पष्ट आहे. देवी एकवीरेचे कालौघात बदलले गेलेले कार्ल येथील मंदिर हे मुळचे महामायेचे असू शकेल असे पुरावे आता मिळु लागले आहेत. म्हणजेच कोलीय गणाने एके काळी बौद्ध धर्माची पाठराखन मोठ्या प्रमाणावर केली होती हे सिद्ध होते. कारण त्या महनीय धर्माचा संस्थापक त्यांच्याच गणात जन्माला आलेला होता.

आगरी समाजाचे मानवी संस्क्रुतीवर फार मोठे उपकार आहेत. हा खरा संशोधक व निर्माणकर्ता समाज होय! मिठाचा इतिहास म्हनजे आगरी समाजाचा इतिहास होय...या समाजाचा इतिहास वैदिक संस्क्रुतीपेक्षाही पुरातन म्हणजे किमान सात हजार वर्ष एवढा प्राचीन आहे. सर्वांनीच त्यांचे मिठ खाल्ले आहे. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्क्रुती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो हे या निमित्ताने लक्षात यावे!

Tuesday, 17 July 2012

राजमाता अहिल्याबाई होळकरांची भारतभरातील कामे-


"पुर्वजानीं मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरि चालेल, परंतू देशद्रोही पेशव्यांचे आणि ब्रिटीशांचे कपटकारस्थान चालु देणार नाही. हे राज्य माझ्या पुर्वजानीं तलवारीच्या बळावर जिंकले आहे भाडभडवीगिरी करून नव्हे. प्रजेचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे. मी अबला आहे असे समजु नका, वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही." 

राजमाता अहिल्यादेवी होळकर.







राजमाता अहिल्याबाई होळकरांची भारतभरातील कामे-

मूळ संधर्भ - 'पुण्यश्लोक अहिल्या' लेखक- श्री. एम. एस. दिक्षित,'अहिल्याबाई ' लेखक- श्री. हिरालाल शर्मा

अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
अलमपूर (मप्र) हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
अमरकंटक(मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अंबा गाव दिवे.
आनंद कानन श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
बद्रीनारायण (उ.प्र.) श्री केदारेश्वर मंदिर,हरी मंदिर,अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
बीड (महाराष्ट्र)घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
भानपुरा नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भरतपूर मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भीमाशंकर(महाराष्ट्र) गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर.
बिठ्ठुर ब्रह्मघाट
बऱ्हाणपूर (मप्र) घाट व कुंड.
चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) विष्णु व रेणुकेचे मंदिर.
चौंडी चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
चित्रकूट(उ.प्र.) - श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा
चिखलदा अन्नक्षेत्र
द्वारका(गुजरात) मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
वेरूळ(महाराष्ट्र) लाल दगडांचे मंदिर.
गंगोत्री विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) विष्णुपद मंदिर.
गोकर्ण रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घ्रुष्णेश्वर (वेरूळ)(महाराष्ट्र) शिवालय तीर्थ.
हांडिया सिद्धनाथ मंदिरे,घाट व धर्मशाळा
हरिद्वार (उ.प्र.) कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
हृषीकेश' – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
इंदूर अनेक मंदिरे व घाट
जगन्नाथ पुरी (ओरिसा) श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर
जामघाट भूमिद्वार
जांबगाव रामदासस्वामी मठासाठी दान
जेजुरी(महाराष्ट्र) मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
कर्मनाशिनी नदी पूल
काशी (बनारस) काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी,अहिल्या द्वारकेश्वर,गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे,मंदिरांचे घाट,मनीकर्णिका,दशस्वमेघ,जनाना,अहिल्या घाट,उत्तरकाशी,रामेश्वर पंचक्रोशी,कपीलधारा धर्मशाळा,शितल घाट.
केदारनाथ धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर(महाराष्ट्र) मंदिर-पूजेसाठी सहाय्य.
कुम्हेर विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव दिवे.
मनसा सात मंदिरे.
मंडलेश्वर शिवमंदिर घाट
मिरी (अहमदनगर)(महाराष्ट्र) सन १७८० मध्ये भैरव मंदिर
नैम्बार(मप्र) मंदिर
नाथद्वार अहिल्या कुंड,मंदिर,विहिर.
निलकंठ महादेव शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य(उ.प्र.) महादेव मंडी,निमसर धर्मशाळा,गो-घाट,चक्रीतिर्थ कुंड.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)विहिर.
ओंकारेश्वर (मप्र) मामलेश्वर महादेव,आमलेश्वर,त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जिर्णोद्धार,गौरी सोमनाथ मंदिर,धर्मशाळा,विहिरी.
ओझर (अहमदनगर)(महाराष्ट्र) २ विहिरी व कुंड.
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)श्री राम मंदिर,गोरा महादेव मंदिर,विघ्नेश्वर मंदिर,धर्मशाळा,रामघाट.
पंढरपूर(महाराष्ट्र) श्री राम मंदिर, तुळशीबाग,होळकर वाडा,सभा मंडप,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास(नाशिक) (महाराष्ट्र)विहिर.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर,घाट व धर्मशाळा,बगीचा,राजवाडा.
पुणे (महाराष्ट्र)घाट.
पुणतांबे(महाराष्ट्र) गोदावरी नदीवर घाट.
पुष्कर गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
रामेश्वर (तामिळनाडु) हनुमान,श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
रामपूरा चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रावेर (महाराष्ट्र)केशव कुंड
साखरगाव (महाराष्ट्र)विहिर.
संभल?(संबळ) लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
संगमनेर (महाराष्ट्र)राम मंदिर.
सप्तश्रुंगी धर्मशाळा.
सरढाणा मिरत चंडी देवीचे मंदिर.
सौराष्ट्र (गुजरात) सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर,जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
श्री नागनाथ (दारुकवन) १७८४ मध्ये पूजा सुरू केली.
श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल,आ.प्र.) शिवाचे मंदिर
श्री शंभु महादेव पर्वत,शिंगणापूर (महाराष्ट्र) विहिर.
श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जिर्णोद्धार.
श्री विघ्नेश्वर दिवे
सिंहपूर शिव मंदिर व घाट
सुलपेश्वर महादेव मंदिर व अन्नछत्र
सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)मंदिर
तराना? – तिलभंडेश्वर?शिव मंदिर,खेडपती,श्रीराम मंदिर,महाकाली मंदिर.
टेहारी? (बुंदेलखंड) धर्मशाळा.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)कुशावर्त घाटावर पुल.
उज्जैन (म.प्र.)चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
वृंदावन (मथुरा) चैनबिहारी मंदिर,कालियादेह घाट,चिरघाट व इतर अनेक घाट,धर्मशाळा व अन्नछत्र.
वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) होळकर वाडा व विहिर.

प्रकाशित पुस्तके

'पुण्यश्लोक अहिल्या' लेखक- श्री. एम. एस. दिक्षित
'अहिल्याबाई ' लेखक- श्री. हिरालाल शर्मा
'अहिल्याबाई चरित्र' लेखक- श्री. पुरुषोत्तम
'अहिल्याबाई चरित्र' लेखक- श्री. मुकुंद वामन बर्वे
'कर्मयोगिनी' लेखक- विजया जहागीरदार
'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक- विनया खडपेकर

Saturday, 26 May 2012

शालिवाहन शक सातवाहन राजांशी संबंधित आहे


शालिवाहन शक सातवाहन राजांशी संबंधित आहे-

संदर्भ 
.विकिपीडिया 
.महाराष्ट्र गेझीटियर 

↑ 
इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होतीपण त्या साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडलीतोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा नव्हतीत्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वाविमिराशी यांनी सिद्ध केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावलीसर २ रापृष्ठ ६४


सातवाहन साम्राज्यातील गौतमी पुत्र सातकर्णी या धनगर राजाचा विजय उत्सव म्हणजे "गुढीपाडवा". पण समाजाने चुकीच्या पुराण कथा लिहिल्या. ब्रह्माने शुर्ष्टी निर्माण केली आणि रामाचा संबंध या समाजाने जोडला.

विशेष पाहता धनगर सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी या महाराष्ट्री प्राकृत महापराक्रमी राजाने शकांना २० वर्ष लढाई करून हरविले. आणि मराठी काळ गणना सुरु केली त्याला शके आपण म्हणतो.


हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या अहिर -धनगर शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मात्र, आपल्याला फारशी माहिती नसते.

अहिर -धनगर शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

याच अहिर -धनगर सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.

शक संवत- शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.

विक्रम संवत- भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.

गौतमीपुत्र शातकर्णी (ऊर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: .. ७८-.. १०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो.
गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्हव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.
अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.
आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नहपान राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नहपानाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई

गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा(शालिवाहन शकाचा) आकडा ग्रेगरियन कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो.
स्वत:ला राजर्षिवधू म्हणवून घेणार्‍या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"
क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

आख्यायिका

या राजाबद्दल प्रसिद्ध असणार्‍या काही आख्यायिकांची नोंद येथे केली आहे.
शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला.



************************************************************************

सातवाहन 

(संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.)


महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.

यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे 

हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमानमहाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील पांडवलेणी या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली.

सातवाहन राजघराणे
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे
बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. हे राजे वैदिक धर्माभिमानी होते. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा ही लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.

राज्यकर्ते
सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.


शातकर्णी मुद्रा
नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात :
 राजा सिमुक सातवाहन,
 राणी नागणिका,
 राजा श्री सातकर्णी (नागणिकेचा पती),
 कुमार भाय (राजपुत्र),
 महारठि गणकयिरो अथवा महारथी गणरयिर (राणी नागणिकेचे पिता),
 कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
 कुमार सातवाहन (राजपुत्र)
हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.


ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढील प्रमाणे नोंदवितो.

 सिमुक सातवाहन(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
सिमुक सातवहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करुन शुंगाची सत्ता नष्ट करुन आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
 कृष्ण सातवाहन( सिमुकचा धाकटा भाऊ..)
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
 सातकर्णी पहिला (नागनिकेचा पती.)
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाटयेथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
 वेदिश्री
 सतिसिरी (शक्तिश्री)
 हाल सातवाहन
 गौतमीपुत्र सातकर्णी
 आपिलक
 कुंतल
 सुनंदन
 सुंदर
 वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
 वाशिष्ठीपुत्र शिवश्री पुलुमावी
 वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
 गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
 गौतमीपुत्र विजय सातकर्णी
 चंड सातकर्णि
 वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी
 पुलुमावी (पुळुमावि)
 यज्ञ सातकर्णी
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौसिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणार्‍या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.

आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे

इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. 
हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते.

गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो.

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.


गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.
या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात (KShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत आहे..

शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती. शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.

उपक्रमावरील एका सदस्यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.

आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:
1. सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
2. कृष्ण(भात) १०
3. श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी) १०
4. पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
5. स्कंधस्तंभ १८
6. शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
7. लंबोदर १८
8. आपीतक(आपीलक, दिविलक) १२
9. मेघस्वाति १८
10. स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
11. स्कंदस्वाति ७
12. मृगेंद्रस्वातिकर्ण ३
13. कुंतलस्वातिकर्ण ८
14. स्वातिवर्ण १
15. पुलोमावी ३६
16. अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
17. हाल ५
18. मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
19. पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु) २१
20. सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
21. चकोरशातकर्णी ६ महिने
22. शिवस्वाति २८
23. गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
24. पुलोमत् २८
25. शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
26. शिवश्री ७
27. शिवस्कंध ३
28. यज्ञश्री शातकर्णी २९
29. विजय ६
30. चंडश्री १०
31. पुलोमत् ७.

संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.

चित्र पहा
१.इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. 
हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते. 
२.आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे
३.ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे
४.शातकर्णी मुद्रा








सातवाहन राजांची वंशावळ
































































































































































































































































































































































































































































































































बाह्य दुवे

§  सातवाहनांचा इतिहास (इंग्रजी मजकूर)
§  सातवाहन (इंग्रजी मजकूर)
§  "तेलमन भाषा तेलुगू (इंग्रजी मजकूर