Saturday, 26 May 2012

शालिवाहन शक सातवाहन राजांशी संबंधित आहे


शालिवाहन शक सातवाहन राजांशी संबंधित आहे-

संदर्भ 
.विकिपीडिया 
.महाराष्ट्र गेझीटियर 

↑ 
इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होतीपण त्या साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडलीतोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा नव्हतीत्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वाविमिराशी यांनी सिद्ध केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावलीसर २ रापृष्ठ ६४


सातवाहन साम्राज्यातील गौतमी पुत्र सातकर्णी या धनगर राजाचा विजय उत्सव म्हणजे "गुढीपाडवा". पण समाजाने चुकीच्या पुराण कथा लिहिल्या. ब्रह्माने शुर्ष्टी निर्माण केली आणि रामाचा संबंध या समाजाने जोडला.

विशेष पाहता धनगर सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी या महाराष्ट्री प्राकृत महापराक्रमी राजाने शकांना २० वर्ष लढाई करून हरविले. आणि मराठी काळ गणना सुरु केली त्याला शके आपण म्हणतो.


हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या अहिर -धनगर शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मात्र, आपल्याला फारशी माहिती नसते.

अहिर -धनगर शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

याच अहिर -धनगर सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.

शक संवत- शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.

विक्रम संवत- भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.

गौतमीपुत्र शातकर्णी (ऊर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: .. ७८-.. १०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो.
गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्हव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.
अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.
आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नहपान राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नहपानाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई

गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा(शालिवाहन शकाचा) आकडा ग्रेगरियन कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो.
स्वत:ला राजर्षिवधू म्हणवून घेणार्‍या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"
क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

आख्यायिका

या राजाबद्दल प्रसिद्ध असणार्‍या काही आख्यायिकांची नोंद येथे केली आहे.
शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला.



************************************************************************

सातवाहन 

(संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.)


महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.

यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे 

हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमानमहाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील पांडवलेणी या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली.

सातवाहन राजघराणे
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे
बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. हे राजे वैदिक धर्माभिमानी होते. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा ही लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.

राज्यकर्ते
सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.


शातकर्णी मुद्रा
नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात :
 राजा सिमुक सातवाहन,
 राणी नागणिका,
 राजा श्री सातकर्णी (नागणिकेचा पती),
 कुमार भाय (राजपुत्र),
 महारठि गणकयिरो अथवा महारथी गणरयिर (राणी नागणिकेचे पिता),
 कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
 कुमार सातवाहन (राजपुत्र)
हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.


ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढील प्रमाणे नोंदवितो.

 सिमुक सातवाहन(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
सिमुक सातवहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करुन शुंगाची सत्ता नष्ट करुन आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
 कृष्ण सातवाहन( सिमुकचा धाकटा भाऊ..)
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
 सातकर्णी पहिला (नागनिकेचा पती.)
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाटयेथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
 वेदिश्री
 सतिसिरी (शक्तिश्री)
 हाल सातवाहन
 गौतमीपुत्र सातकर्णी
 आपिलक
 कुंतल
 सुनंदन
 सुंदर
 वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
 वाशिष्ठीपुत्र शिवश्री पुलुमावी
 वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
 गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
 गौतमीपुत्र विजय सातकर्णी
 चंड सातकर्णि
 वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी
 पुलुमावी (पुळुमावि)
 यज्ञ सातकर्णी
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौसिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणार्‍या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.

आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे

इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. 
हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते.

गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो.

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.


गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.
या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात (KShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत आहे..

शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती. शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.

उपक्रमावरील एका सदस्यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.

आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:
1. सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
2. कृष्ण(भात) १०
3. श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी) १०
4. पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
5. स्कंधस्तंभ १८
6. शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
7. लंबोदर १८
8. आपीतक(आपीलक, दिविलक) १२
9. मेघस्वाति १८
10. स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
11. स्कंदस्वाति ७
12. मृगेंद्रस्वातिकर्ण ३
13. कुंतलस्वातिकर्ण ८
14. स्वातिवर्ण १
15. पुलोमावी ३६
16. अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
17. हाल ५
18. मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
19. पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु) २१
20. सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
21. चकोरशातकर्णी ६ महिने
22. शिवस्वाति २८
23. गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
24. पुलोमत् २८
25. शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
26. शिवश्री ७
27. शिवस्कंध ३
28. यज्ञश्री शातकर्णी २९
29. विजय ६
30. चंडश्री १०
31. पुलोमत् ७.

संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.

चित्र पहा
१.इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. 
हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते. 
२.आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे
३.ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे
४.शातकर्णी मुद्रा








सातवाहन राजांची वंशावळ
































































































































































































































































































































































































































































































































बाह्य दुवे

§  सातवाहनांचा इतिहास (इंग्रजी मजकूर)
§  सातवाहन (इंग्रजी मजकूर)
§  "तेलमन भाषा तेलुगू (इंग्रजी मजकूर