Sunday, 13 May 2012

एलेफंटा गुहा –



                                                  एलेफंटा गुहा


सहल खूप अविस्मरणीय होती. खात्री आहे कि सर्वांनी खूप मौज मजा घेतली. असो मी तो दिवस छायाचित्राच्या रूपाने माझ्या ऑफिस च्या मित्रान साठी ब्लोग वर संग्रहित करत आहे.  

महाराष्ट्रातील सातारा,पुणे,कोल्हापूर या जिल्ह्यातील गडकिल्ले मी बरेच फिरलो आहे पण घारापुरी लेणी चा पाहण्याचा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. ह्या लेणी पाहायला मुंबई गेटवे ऑफ इंडिया वरून बोटीने जावे लागते. बोटीचा साधारण एक तास वीस मिनिटांचा प्रवास करून घारापुरी बेटावर जाता येते. बेटावर गेल्यावर चोही कडे वनविभागाने वृक्षारोपण केलेले नझरेस पडते.बेटावर गेल्यास ३० मिनिटाची चढाई केल्यावर मी एलेफंटा गुहे जवळ गेलो. भारतीय पुरातत्व खात्याकडे या घुहेचे अधिकार आहेत. पोर्तुगीझांना या बेटावर मोठ्या आकाराची हत्तीची मूर्ती सापडली होती. त्यामुळे गुहेंना एलेफंटा केव म्हणतात. आता ती हत्तीची विशाल मूर्ती वीर जिजामाता उद्यान भायकाळा येथे ठेवण्यात आलेली आहे. 

गुहेतील विशाल दगडी मूर्ती पाहून आश्चर्य वाटते आणि प्रत्येक गुहे मध्ये विशाल शिवलिंग आहेत. इतकी विशाल शिवलिंग महाराष्ट्रातील बराच कमी ठिकाणी आहेत. तसेच महेशाची विशाल त्रिमूर्ती हि एलेफंटा गुहेची खरी ओळख म्हणावी लागेल. हि मूर्ती विशाल असून मूर्ती डोळे बंद आहेत. आणि दगडी नक्षीकाम लक्ष वेधून घेते.  महत्वाचे म्हणजे पूर्वी त्यानिर्जन बेटावर बदामी चालुक्य पुलकेशी दुसरा याला कुशल नसलेल्या आणि नवख्या मूर्तीकारान कडून ह्या उच्च दर्जाच्या मूर्ती घडविल्या आहेत हे कळल्यावर आश्चर्य वाटले.

मी थोडा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेह्वा असे कळले कि या गुहा कधी निर्माण केल्या या बद्दल इतिहास करांमध्ये वाद-विवाद आहेत. दंतकथे ला इतिहासकार प्रमाणभूत मानत नाहीत. या बेटावर भारतीय पुरातत्व खात्याला "क्षत्रपा मुद्रा" सापडल्या असून त्या इ स. ४ शतकातील आहेत. कोकण मौर्यांच्या एक सागरी युद्धामध्ये बदामी चालुक्यांनी पुलकेशी-दुसरा ने पराभव केला होता. इ स ६३५. त्यावेळी एलेफंटा ला पुरी/ पुरिका असे म्हटले जायचे. 
काही इतिहासकरांच्या मते कालाचुरीस अथवा कोकण मौर्यनि या गुफा घडविल्या असाव्यात.  
एलेफंटा गुहा ह्या पशुपत शैव वेदिक (हिंदू) धर्माला समर्पित आहेत. 

चालुक्यांनी कालाचुरीस आणि कोकण मौयाच्या दारूण पराभव केला आणि या एलेफंटा च्या मुख्य गुहेचे तेच निर्माणकरते चालुक्याच असावेत. परंतु काही इतिहासकरांच्या मते सातव्या दशकातील राष्ट्रकुट राजे हे पण याचे निर्माते असू शकतात. हा शेवटचा अंदाज त्यांनी लावला आहे तो हि पाटण्या सारखाच आहे. कारण आठव्या दशकातील राष्ट्राकुतांची मंदिर स्थापथ्य कला तर जग्द्यात आहे.  उदाहरणार्थ  कैलाश आणि एलोरा. 

एलेफंटा वरील ब्रह्माची त्रिमूर्ती आणि शिव मूर्ती तसेच ब्रह्मा,विष्णू आणि महेश हे राष्ट्राकुतांचे शाही प्रतीक चिन्ह होते. तसेच नटराज,अर्धानारीश्वारा या मूर्ती राष्ट्राकुता साम्राज्यांने बनविल्या आहेत. आणि राष्ट्राकुता हे शिवाचे उपासक होते त्यामुळे एलेफंटा गुहे संधर्भातील शेवटचा इतिहासकरांचा अंदाज अतिशय योग्य वाटतो. 

घारापुरी बेटावरील लोक महाशिवरात्रीला चा उत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरा करतात.पोर्तुगीझांनी येथील गुहेचे बरेच नुकसान केलेले दिसून येते. पोर्तुगीझांची सत्ता असताना टार्गेट प्रक्टिस साठी ते ह्या गुहेचा वापर करत असत. त्यामुळे गुहेच्या बर्याच नुकसानाला इतिहासकार पोर्तुगीज सैनिकांना जवाबदार धरतात. पोर्तुगीझांनी १६६१ साली या मुंबई आणि बेटाचे सर्व अधिकार इंग्रजांना दिले. 

गुफांना १९८७ मध्ये यूनेस्को विश्व विरासत स्थळाच्या रुपामध्ये यूनेस्को च्या सांस्कृतिक मानदंडानुसार नामित केले आहे.



विठ्ठल खोत 
















No comments:

Post a Comment