धनगर समाजाने उगाचच ब्राह्मण द्वेष करणे योग्य नाही-
ब्राह्मण
समाजाने भूतकाळामध्ये जाती व्यवस्था बळकट केली होती शूद्रांना हीन वागणूक दिली
होती. त्यांना मनुस्मृतीतील कायदे लागू केले होते. परंतु मनुस्मृती हा कलियुगात लागू होणारा ग्रंथ नाही.आता परिस्तिथी पूर्ण पणे बदलली असून जातीव्यवस्था कमजोर झालेली
दिसते. कारण आता कोणी हि कोणता व्यवसाय आपल्या आवडी नुसार निवडून काम करू शकतो.
मागासवर्गाला सरकारकडून शिक्षण आणि नोकरी मध्ये विशेष सवलती आहेत. फक्त बहुजन
समाजाला गरज आहे ती परीश्रामाची आणि धाडसाची.
ब्राह्मण समाजाने पूर्वी काही अन्याय केले असतील म्हणून आपण त्यांना आपण त्रास
देले योग्य नाही. पूर्वी जे काही झाले ते असमर्थनीय आहे आणि त्याचे कुणीही समर्थन
करू शकत नाही.हो जर लढा विचारसरणीशी आहे तर जरूर आपण शुद्ध विचार आणि शुद्ध
आचाराने त्यांच्याशी सामना केला पाहिजे.
काही चांगल्या ब्राह्मण व्यक्तींनी धनगर आणि पशुपालक साम्राज्यांना केलेले
सहकार्य -
ब्राह्मण समाजाने नेहमी धनगर आणि पशुपालकांच्या राज्यामध्ये मार्गदर्शकाचे काम
केले आहे त्याचे पुरावे खालील प्रमाणे आहेत-
मेश्पालक चंद्रगुप्त मौर्य यांच्या यांचे गुरु आणि राजकीय मार्गदर्शक हे
आर्य-चाणक्य हे पण ब्राह्मणच होते. त्यांनी कोटियन अर्थशास्त्र ग्रंथ मौर्यांच्या
येणाऱ्या पिद्यांसाठी लिहीन ठेवला होता-
चाणक्य (कालमान: अंदाजे इ.स.पू. ३५०च्या सुमारास) हा सम्राट चंद्रगुप्त
मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट
चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यास तोच कारणीभूत होता, असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र ग्रंथ हा भारतीय
संस्कृतीतील एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा
ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे
मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. कौटिलीय
अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या
लेखनाचा परिणाम हा त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो.
उदाहरणार्थ, योगेश्वर याज्ञवल्क्याने लिहिलेली याज्ञवल्कल्य
स्मृती, हे ग्रंथ. पंचतंत्र या प्रसिद्ध वाङमयाचा
कर्तादेखील ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.
यदुवंशी धनगर यादव साम्राज्य -
गवळी-धनगर राजा रामचंद्र हा यादव साम्राज्यातील राजाचा ब्राह्मण हेमाद्री
नावाचा प्रधान होता. त्यांने मोडी लिपीचा शोध लावला. या मोडी लिपी मध्ये मराठी
भाषा १९५६ पर्यंत लिहिली जात असे.राजा राम च्या काळामध्ये मराठी ला दरबारी भाषेचा
दर्जा मिळाला होता.
म्हणजे मराठी भाषा हि खऱ्या अर्थाने गवळी- धनगरांच्या यादव साम्राज्या मध्ये
समृद्ध तथा उत्कर्ष झाल्याची आपल्याला विलक्षण माहिती मिळते.
हेमाड पंथी मंदिरांची बांधकामे हि हेमाद्री या गवळी-धनगर यादव साम्राज्याच्या
प्रधानाच्या देखारीखी आणि मार्ग दर्शनातून झाली होती.त्यामुळे या बांधकाम शैली ला
हेमाड पंथी बोलले जाते.इतकेच नाही तर हेमाद्री ने "आयुर्वेद रसायन "या
वैदक शास्त्रावर ग्रंथ निर्मिती पण केली होती.तसेच शेती मध्ये बाजरी या पिकाची
लागवडी संधार्बातील संशोधन केले. शिवाय एय्तिहासिक पुस्तक "हेमाड पंथी बखर
" यांनी लिहिले.
कुरूब-धनगर हरिहर बुक्कराय यांचे विजयनगर साम्राज्य -
हे साम्राज्य मुस्लीम साम्राज्याच्या बरोबर मध्ये होते. तसेच हरिहर बुक्कराय
यांना हि मुस्लीम धर्म परिवर्तना नंतर परत वेदिक धर्मात प्रवेश ब्राह्मण समाजाने
दिला होता.
हरिहर बुक्कराय यांच्या साहसी कार्याची प्रेरणा त्यांनी ब्राह्मण विद्वान माधव
विद्यारण्य तसेच वेदांचे प्रसिद्ध भाष्यकार 'सायण' कडून प्रेरणा मिळाली होती.
धनगरांचे होळकर साम्राज्य-
मल्हाररांवाच्या मामाला शेकडो चौथाई वसूलीचे गावाचें अधिकार होते त्याकारणे मल्हाररावांकडे किमान पाच हजारची फौज होती.
मल्हाररांवाच्या मामाला शेकडो चौथाई वसूलीचे गावाचें अधिकार होते त्याकारणे मल्हाररावांकडे किमान पाच हजारची फौज होती.
मल्हारराव वीरकर( होळकर) मल्हारराव यांचे आडनाव वीरकर परंतु होळ्गावामुळे
होळकर नाव चिकटले. मल्हारराव होळकरांच्या सैन्यातील घोड्यासाठी चारा मिळवण्यासाठी काही चरावू कूरणे हवी होती तेव्हा बाजीरावाची फौज आणि मल्हाररावाची फौज एकमेकामध्ये भीडली तेव्हा त्यांच्यात समेट झाली आणि नंतर बाजीरावाने मल्हाररांना आपल्या बाजूला केले श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मल्हारराव होळकरांची चागली मैत्री
झाली. मल्हारराव या धनगराला प्रथम संधी देणारे पण ब्राह्मण पेशवे होते हे विसरून
चालणार नाही. (परंतु श्रीमंत बाजीराव पेशवे हे जाती-भेदातील उत्तम उदाहरण म्हणता
येयील.)
पुढे होळकर साम्राज्य कसे वाढले जग्ज्ञात आहे.
विठ्ठल खोत
No comments:
Post a Comment