ते विज्ञात नवे नवे शोध
लावतात आह्मी इतिहासात -
काही अब्ज वर्षांपूर्वी धूमकेतू वा हिमपिंडांनी
पृथ्वीवर जीवोत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण केलं असल्याचा दावा काही
शास्त्रज्ञांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांच्या मते अब्जावधी
वर्षांपूर्वी पृथ्वीवर धडकलेल्या धूमकेतूमुळे या ग्रहावर जीवोत्पत्तीसाठी आवश्यक
असणारी तत्वं पसरवली. त्यातूनच आजचं सजीवांनी भरलेलं जीवन बहरून आलं. जीवसृष्टीची
संपूर्ण उलाढाल या धूमकेतूच्या आपटण्यातून झालेली आहे.
यासंबंधी शोधकार्य करत असणाऱ्या संघटनेच्या
प्रमुख जेनिफर जी ब्लँक यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या शक्तिशाली
बंदूका आणि काँप्युटर मॉडेल्सच्या मदतीने या प्रक्रियेचा अभ्यास केला गेला. जेव्हा
धूमकेतुंनी पृथ्वीतलावरील वातावरणाला २५,००० मैल प्रति सेकंदच्या वेगाने येऊन धडक दिली, तेव्हा
धूमकेतूमधील काही तत्वं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरली.
ब्लँक म्हणाल्या आमच्या शोधातून हे लक्षात
येतंय की जीवसृष्टी निर्माण करणारं वातावरण त्यानंतरच्या विविध परिस्थितींमध्येही
टिकून राहिलं. जीवसृष्टीतील रहस्य शोधण्याचं काम बऱ्याच काळापासून चालू आहे. यात
धूमकेतूच्या आपटण्याने जीवोत्पत्ती निर्माण झाली असावी, असा
दावा करणारा एक सिद्धांत आहे. या शोधातून अशा सिद्धांताला पुष्टी मिळत आहे.
३.५ अब्ज वर्षांपूर्वी या वसुंधरेवर सजीवांचे
आगमन झाले ही विश्वातील अनन्यसाधारण घटना आहे. तेव्हाच सजीवांचे आनुवंशिक तत्व आणि
आज्ञावल्या निर्माण झाल्या. त्यांच्यात उत्क्रांती होतहोत, सजीवाच्या
लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी मानवाचे, सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी, अवतरण
झाले. उत्क्रांती थांबली नाही, सुरूच आहे. पुढील ७० लाख वर्षांनी, मानवापासून
कोणता प्राणी उत्क्रांत होईल, कल्पना करवत नाही. सजीवांचे आनुवंशिक तत्व आणि
आनुवंशिक आज्ञावल्या, पृथ्वीवर, सजीव जोपर्यत जगू शकतात तोपर्यंत राहणार आहेत. म्हणून धूमकेतूच्या माध्यमातून
आलेले एकपेशीय जीव हेच खरे पृथ्वीचे मालक आहेत. कोणीही असो, त्याचे
पुरातन मुळ हे याच एकपेशीय जीवांमध्ये आहे हे भान हरपले आणि तेथेच सर्व समाजांची
अधोगती सुरु झाली.
वरील पोस्टर मला मारुती औटी या मित्राने मेल केला
आणि त्यामागचा उद्देश समजण्याचा मी प्रयंत्न करत राहिलो. विज्ञात आणि त्याचा
शोधाचा मानवी जीवनाला अधिक सुखकर बनवत असतो. आणि त्यात सर्वांना रस असणे स्वाभाविक
आहे. विद्यानाच्या लेखी माणूस एक प्राणी आहे आणि मनुष्य हीच एक जात आहे.
पहिले तर मनुष्य हा इतर प्रांण्याचा खूप नंतर
आलेला आहे. समुद्री शार्क, देवमासा हे लाखो वर्षापासून
समुद्रावर अधिराज्य करणारे सजीव आहेत. आफ्रिकेतील एक प्रदेशातून पूर्ण पृथ्वीवरील बर्याच
प्रदेशावर मानव समाज समृद्ध प्रदेशात स्थलांतरित झाला. युरोपीन अथवा थंड प्रदेशात
गेलेल्या लोकांना त्वचेतील मेलेलीन ची आवशकता कमी होती. त्यामुळे त्यांची त्वचा
गोरी पहावयास मिळते. जाती परंपरागत व्यवसायावर आधारित होत्या.
जातीच्या भिंती किती भक्कम करताना मनुष्य हेच
विसरत चालला आहे कि तो एक मनुष्य प्राणी आहे अगदी इतर सस्तनी प्राण्यान प्रमाणे
फक्त त्याचा मेंदू इतर प्राण्यान पेक्षा प्रगत आहे. म्हणून मानवी जीवनीतील
सुख-सुविधांचा आपण उपभोग घेवू शकतो.जाती
या माणसाने माणसा साठी तयार केलेली जीवनशैली आहे.
परंतु इतिहासातील शोध हे मानवी जीवनावर
विज्ञाना इतका प्रभाव पाडू शकत नाहीत किंबहुना मी असे पाहिले आहे.विशिष्ठ
राजघराण्याचा अभिमान घराणे कमी परंतु तो समाज जास्त मिरवत असतो. जर एकाद्या
राजघराण्याला इतिहास मोठा असेल तर त्या राजघराण्याच्या जातीला तो अभिमान
मिरवण्याची गरज नसते. आणि इतिहासाला नवीन पुरावे नवीन संशोधनाचा नवीन पिढीला
अभिमान बाळगण्या व्यतिरिक्त काहीच उपयोग नसतो. जर नवीन इतिहास संशोधन किह्वा नवीन
साम्राज्याचा इतिहास समोर येत असेल तर तो एका विशिष्ठ समाजाचा नसून पूर्ण मानव
जातीचा इतिहास म्हटले गेले पाहिजे.
विशिष्ठ समृद्ध युद्धशास्त्र प्रवीण संस्कृती
ने थोड्या मागास युद्धशास्त्राचा पराभव इतिहासामध्ये केलेला आहे. आणि आपली
संस्कृती आणि सभ्यता त्यांच्यावर लादण्याचे काम झालेले सर्व इतिहासात दिसून येते.
विठ्ठल खोत
No comments:
Post a Comment