Saturday 17 March 2012

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार! 


संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार! 

यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

प्रगतीला सुरवात कॉंग्रेस च्या आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या राज्यात झाली. महाराष्ट्राचे कॉंग्रेस चे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि शेवटी हिंदुस्थानचे उप - पंतप्रधान अशी पदे या महान नेतृत्वाने भूषविली आहेत. 
सातारा जिल्हा चा खरा वाघ ज्याने कधीच दिल्लीच्या नेतृत्वाला जुमानले नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंना चीन युद्धा दरम्यान यशवंतराव यांना सवरक्षण मंत्री करावे लागले होते. तेह्वा पूर्ण हिंदुस्थानाने म्हणले " हिमालयाच्या रक्षणा साठी सह्याद्री धावून गेला".

महाराष्ट्र मध्ये खरी हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांतीचे हेच जनक होते. महाराष्ट्रामध्ये प्रतेच्क झिल्याला MIDC दिसतात ते यांच्या मुळे दिसतात. भामा अनु-शक्ती ची कल्पना यशवंतराव यांचीच.

शिवाय हे एक उत्तम लेखक होते त्यांना कला, क्रीडा आणि विशेष म्हणजे साहित्याची खूप आवड होती त्यांची ग्रंथ संपदा खूप मोठी होती. आणि महाराष्ट्रामध्ये वाचन परंपरा रुझावी म्हणून त्यांनी मेहनत केली.

कॉंग्रेस चे नेते यशवंतराव चाव्हान्नाचा वारसा जपू शकले नाही. इतकेच नह्वे तर बाराष्ट्राचारामध्ये देशाला घेवून गेले. निष्टावान कॉंग्रेस च्या जेष्ठ नेत्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. 

‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले. ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असे त्यांचे गुणवर्णन करता येईल.

गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी झेप घेतली. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी इ.स. १९१३ मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) इ.स. १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.
इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .
- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)
- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
- कोल्हापूर बंधार्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (शैक्षणिक विकास)
- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

 
विठ्ठल खोत