Saturday 7 January 2012

धनगर आणि गवळी समाजात कुत्र्याचे महत्व -





धनगर आणि गवळी समाजात कुत्र्याचे महत्व -


धनगर आणि पशुपालक समाजात कुत्र्याचे महत्व हे एका घरच्या सदस्या प्रमाणे असते. तसेच आमच्या सातारा तालुक्यामध्ये कुत्र्याला खंडोबाचा अवतार मानले जाते. अगदी अश्म युगापासून कुत्रा हा प्राणी मानवा बरोबर असल्याची आपल्याला माहिती मिळते.


१ खंडी (खंडी म्हणजे २० अंकांची गणना धनगरी भाषेमध्ये करण्याची पद्दत आहे) म्हणजे १ खंडी म्हणजे २० गायी किव्हा २० मेंद्या असे म्हणू शकतो. अश्या १ खंडी मागे एक राखणी ला एक कुत्रा असणे गरजेचे असते.अश्या पाच ते सहा खंडी शेळी-मेंद्या आणि एक ते दोन खंडी गायी किव्हा याहून अधिक एवड्या मोठ्या प्रमाणात पशुधन धनगर आणि गवळी समाजाकडे असयाचे.पशुधनाची राखण करण्याची जवाबदारी कुत्रावर असते त्यामुळे त्याला देवाचा अंश मानले जाते.


धनगरांच्या इतिहासामध्ये मध्ये याला खूप महत्व दिली आहे. जेजुरीचा मेश्पालक धनगर राजा खंडोबा हा सातवाहन काळामध्ये होयून गेला. या खंडोबा बरोबर नेहमी एक कुत्रा असायचा तो तुह्माला या मी या संदेश बरोबर तो फोटो पण जोडत आहे. खंडोबा जेह्वा असुराबरोबर युद्ध करायचे तेह्वा खंडोबा राजा चा कुत्रा पण शत्रू वर पूर्ण शक्ती निशी तुटून पडत असे.


धनगर राजे तुकोजी होळकर महाराजांनी किल्ले रायगड वर वीस हजार खर्च करून कुत्र्याची समाधी बांधली होती. पण आता या पुतळ्या वरून राजकारण काही औरच चालले असून याचे धनगर आणि पशुपालक बांधवांच्या दुख आहे.


विठ्ठल खोत

Thursday 5 January 2012

मराठी भाषा हि खऱ्या अर्थाने गवळी- धनगरांच्या यादव साम्राज्या मध्ये समृद्ध तथा उत्कर्ष झाल्याची आपल्याला विलक्षण माहिती मिळते.



गवळी-धनगर राजा रामचंद्र हा यादव साम्राज्यातील राजाचा हेमाद्री नावाचा प्रधान होता. त्यांने मोडी लिपीचा शोध लावला. या मोडी लिपी मध्ये मराठी भाषा १९५६ पर्यंत लिहिली जात असे.राजा राम च्या काळामध्ये मराठी ला दरबारी भाषेचा दर्जा मिळाला होता.
म्हणजे मराठी भाषा हि खऱ्या अर्थाने गवळी- धनगरांच्या यादव साम्राज्या मध्ये समृद्ध तथा उत्कर्ष झाल्याची आपल्याला विलक्षण माहिती मिळते.

हेमाड पंथी मंदिरांची बांधकामे हि हेमाद्री या गवळी-धनगर यादव साम्राज्याच्या प्रधानाच्या देखारीखी आणि मार्ग दर्शनातून झाली होती.त्यामुळे या बांधकाम शैली ला हेमाड पंथी बोलले जाते.इतकेच नाही तर हेमाद्री ने "आयुर्वेद रसायन "या वैदक शास्त्रावर ग्रंथ निर्मिती पण केली होती.तसेच शेती मध्ये बाजरी या पिकाची लागवडी संधार्बातील संशोधन केले. शिवाय एय्तिहासिक पुस्तक "हेमाड पंथी बखर " यांनी लिहिले.

विठ्ठल खोत