Saturday 26 January 2013

राष्ट्रीय स्वंयमसेवक संघ आणि लोकांचे गैरसमज




राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि लोकांचे गैरसमज -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डा. केशव बळीराम हेडगेवारांनी नागपुर येथे १९२५ साली केली. हेडगेवार हे मुलत: सशस्त्र क्रांतीचे समर्थक असले तरे नंतर त्यांच्या लक्षत आले कि या खंडप्राय देशात सशस्त्र क्रांती अशक्यप्राय आहे. बाळासाहेब देवरसांनी आपल्या आत्मचरित्रात लिहुन ठेवले आहे कि हेड्गेवारांनी अनेक तरुणांना भगतसिंगाचा मार्ग चोखाळण्यापासुन परावृत्त केले. रा.स्व. संघ हेडगेवारांच्या काळात (१९४०) एक आदर्श संघटना होती. म. गांधींनीही या संघटनेची तारीफ केलेली इतिहासात दिसते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हि आर एस एस च्या गणवेशातील बरीच तत्कालीन छायाचित्र आहेत हि संघटना आतंकवादी कशी असू शकते.

मी स्वत आर एस एस चा श्रीराम शाखा डोंबिवली मधील स्वयंसेवक विद्यार्थी दशेमध्ये होतो. आता कामामुळे मला शाखे मध्ये जाता येत नाही. जवळ जवळ ७ ते ८ वर्ष मी शाखेमध्ये जात असे. परंतु जसे कॉंग्रेस आणि मुस्लिम संघटना आर एस एस ची बदनामी करता आहेत. त्यातील काहीच सत्य नाही. मी काही लोक वायीत असल्यामुळे पूर्ण संघटना वायीट कशी होयू शकते. मग तसे पाहिले तर कॉंग्रेस चे सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंघ कॉंग्रेस च्या पे रोल वर काम करतात असे म्हणावे लागेल.

मी आर एस एस पासून काय शिकलो खालील मुद्यान मध्ये सांगण्याचा पर्यंत करत आहे.

१. जे महामूर्ख लोक आर एस एस ला जातीयवादी संघटना म्हणतात त्यांना कॉंग्रेस ने बहुजनांचे आणि मुस्लिम मतांचे भारतात विभाजन केले आहे. आर एस एस हि संघटना जातीभेद मानत नाही. कारण मी स्वत जातीने गवळी-धनगर आहे. मला तीच वागणूक मिळाली जी एका ब्राह्मणा अथवा मराठयाला मिळाली होती. मुस्लिम द्वेष कधीच कोणत्याच शाखेत झाला नाही. आह्माला हेच सांगण्यात यायचे कि " भारतीय ९५%मुसलमान हे हिंदू धर्मातून धर्मांतरित झालेले आहेत. त्यांचा द्वेष करू नका".  भगव्या झेंड्या खाली भारतातील सर्व जाती जमाती एकत्र यावे हि एक पवित्र भावना होती.आणि कॉंग्रेस जनतेला उलट सांगत आहे.

२.खेळ आणि व्यायाम- आह्मी सर्व स्वयंसेवक आर एस एस च्या शाखे मध्ये जमल्यानंतर आमचे शिक्षक विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जायचे. दंड (लाठी) कसा चालवायचा या संधार्भातील प्रशिक्षण दिले जात होते. परत कराटे आणि जुडो चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जायचे. हे सर्व झाल्यानंतर सुर्यनमस्कार घेतले जायचे. नंतर 1 किलोमीटर धावणी ची शर्यत घेतली जायची. या सर्वाचे उदिष्ठ एकच होते कि त्यांना भारतीय सैन्यासाठी तरुण तयार करायचे होते.

३. संस्कार -भारतभूमी आणि आपल्या माता पित्यावर प्रेम करायला शिकवले जायचे. रोज स्नान करून आई, वडील आणि वडीलधार्या माणसाच्या पाया पडले पाहिजे. देशभक्तीपर गीतांचे समूह गायन रोज शाखेमध्ये होत असे. किंबहुना अजून हि ते सुरु आहे. 

४. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असताना केलेली विधायक कामे- वृक्षलागवड करणे, वृक्षांचे महत्व लोकांना पटवून देणे. तसेच ओसाड जमिनी मध्ये पावूस सुरु होण्या आगोदर बीजारोपण करणे. आमच्या परिसरातील गार्डन स्वच्छता करणे.   

जे कोणी आर एस एस ला वायीट बोलत आहेत त्यांनी एक वर्ष आर एस एस च्या शाखे मध्ये जावून बघा आणि नंतर ठरवा कि "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हि कशी आहे.

विठ्ठल खोत  

2 comments:

  1. खोत साहेब अगदी बरोबर 100% खंरं आहे

    ReplyDelete
  2. I admire your thoughts. You are a true nationalist dhangar.

    ReplyDelete