Friday 2 December 2011

धनगर इतिहास



धनगरांच्या गौरवशाली इतिहासावर एक दुर्शिक्षेप 

(लेखातील प्रमुख मुद्धे डॉ.रामचंद्र चिंतामण ढेरे, संजय सोनवणी, जेष्ठ लेखक इमानदार यांच्या लेखातून तथा पुस्तकातून घेतलेले आहेत)


१.अहिर-धनगरांची सावळदा संस्कृती 
तापी नदीच्या खोर्यामध्ये एक प्राचीन संस्कृती सापडली आहे हि संस्कृती भारतातील सर्वात जुनी हद्दपा आणि मोहंजोदाडो संस्कृती च्या पण आदीची असून हि संस्कृती जवळ जवळ जगातील सर्वात प्राचीन संस्कृती इजिप्त च्या पिरामिड 
च्या कालखंडातील असून हि अहिर-धनगरांची आहे हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे, कारण गायी आणि पशुपालन करणारी साधने आणि उपकरणे मिळाली आहेत. तसेच हि लोके शेती पण उत्तम रीतीने करतात होते बाजरी, आणि नाचणी आणि त्यांची भाषा पण अहिराणी होती.

अहिराणी बोलीला पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. महाभारत कालखंडामध्ये देखील अहिराणी बोलीचा उल्लेख आढळतो. अहिराणी ही कोणत्याही बोलीची पोटभाषा नसून, ती स्वयंभू बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचे अस्तित्व, तिची अस्मिता आणि तिच्या माध्यमातून सृजन झालेले लोकसाहित्य हे जोपासले गेले पाहिजे. या संस्कृतीची ओळख अहिराणी बोलीभाषेच्या माध्यमातून जगात पोहचली पाहिजे, असा सूर 'अहिराणी बोलीभाषा एक अभ्यास' या विषयावरील कार्यशाळेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बोलताना व्यक्त करण्यात आला.
म्हणजे आपणास कळते आहे का आपली धनगर संस्कृती हि जगातील आद्य प्राचीन संस्कुर्ती असून, भारताचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार आणि आद्य निर्माते हे धनगर होते यात तील मात्र शंका उरत नाही.

२. सुबेदार मल्हार राव आणि महाराजा यशवंतराव होळकरांचा हेपुस्कर पणे लपविलेला इतिहास, विशेष म्हंजे मल्हारराव आतिशय पराक्रमी आणि शूर सुबेदार होयून गेले, तुकोजी होळकरांनी तर टिपू सुलतानाला पण लीलया माती चारली होती महाराजा यशवंतराव तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगू शकतात इतका महापराक्रमी आणि रण धुरंधर होते. मल्हारराव होळ्कारांवर बिलकुल इतिहास लेखन झालेच नाही विशेष म्हणजे मराठ्यांचे राज्य विस्तार याच महापुराशाने केला होता.

३. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नेहमी खोटा इतिहास आपणास शालेय पुस्तके सांगतात.राजा बळीप हा यादव घराण्यातला राजपुरुष. गवळी-धनगरांच्या कुळात जन्मलेला. याच बळीप गौळ्याच्या कुळात शिवरायांचे पितामह मालोजी राजे यांचा जन्म झाला. 
असं त्यांचा समकालीन कवी जयराम पिंडेने लिहून ठेवलं आहे.शिवाय DR .रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी त्यांच्या शिखर शिंगणापूर चा शंभू महादेव या पुस्तकामध्ये रामचंद्र ढेरे यांनी संशोधनानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकातील गवळी-धनगराच्या होयसाळा घराण्यातील असल्याचा निष्कर्ष मांडला आहे.

४.सादवाहन (सातवाहन) हे मुळचे औंड्र वंशीय धनगर -अहिरांपैकीच आहेत हे आता नवीन संशोधनानुसार स्पश्ट झाले आहे. सातपुडा पर्वताच्या परिसरात त्यांचा उगम झाला हे त्यांच्या मुलनामावरुन सिद्ध होते. उदा. प्राक्रुतात सातपुडा हा छात-छवत या नावाने ओळखला जात होता. सातवाहनांची मुल प्राक्रुत नावे छातवाहन...छातकरनी अशी आहेत. आद्य सम्राट सिमुखाचे खरे प्राक्रुत नाव छिमुक असे आहे. प्राक्रुत शब्दांचे संस्क्रुतीकरण करण्याच्या नादात मुळ अर्थ हरवण्याचा प्रकार घडला आहे. (पहा: महाराष्ट्र ग्याझेटीयर...प्राचीन काळ-१) थोदक्यात आजच्या सातपुड्याच्या, म्हणजेच खानदेशच्या भुमीतुन हा राजवंश पुढे आला. सातपुडा परिसरातुन आले म्हणुन सातवाहन...याचा संस्क्रुत अर्थ नाही कारण तो प्राक्रुत भाशेतील आहे, पण अनेक विद्वान हा शब्द संस्क्रुतातुन आला असावा असे समजुन अर्थ काढत बसले म्हणुन मोठी फसगत झाली आहे. सादवाहन हे नेहमीच महाराष्ट्री प्राक्रुताचे समर्थक होते...इतके कि त्यांच्या जवळपास ४५० वर्षांच्या कारकिर्दीतील एकही लेख संस्क्रुतात नाही.

५ .१.)वाकाटक २.कदंब (इ स -२०० ) ३.होयसाळा (पशुपालक-धनगर)४.पालव( पशुपालक-धनगर)५.राष्ट्राकुता (अहिर-धनगर)६.विजयनगर साम्राज्य (कुरुबा-धनगर ) विजयनगरचे हुक्काराया आणि बुक्काराया (कुरुबा-धनगर) हे खूप लोकप्रिय राजा होते , न्याप्रीय आणि प्रसंगी अतिशय कठोर आणि विशेष म्हणजे हे कुस्ती या खेळाचे पुरस्कर्ते होते. आणि यादव काळामध्ये तर मराठी भाषेला राज्यकारभाराची भाषा होती.

६.जेजुरीचा खंडोबा -सादवाहनांचे सांगत असतांना जेजुरीच्या खंडेरायाबद्दल लिहिणे अत्त्यवश्यक आहे. खंडोबा हे लोकदैवत असुन नंतर त्याचे मर्तंड-भैरव वा शिवाशी नाते जुळवले गेले असे सोंथायमर ते डा. रा, चिं. ढेरे सांगतात. पण हे वास्तव नाही. धनगर (औंड्र/पुंड्र/अहिर इ.) हे सारेच मुलचे शिवपुजक आहेत. सादवाहन घराण्यात स्कंद (हे संस्क्रुतीकरण आहे...मुळ नाव खंड...त्याच्या काही नाण्यांवर फक्त खद असेही लिहिलेले आहे...कदाचित अनुस्वार कालौघात अस्पष्ट झाला असेल.) हा सम्राट इ.स. १५६ मद्धे होवुन गेला. त्याच्या अलौकिक पराक्रमामुळे हाच राजा जेजुरीचा खंडेराय म्हणुन पुज्य बनला असावा एवढे पुरावे आता समोर येत आहेत. आजही धनगरांना खंडेराय हा किती पुज्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही

७.पंढरपूर नगरात आद्य राजा विठ्ठल होऊन गेला, जवळ जवळ ३५०० वर्ष पूर्वी म्हणजे वेदिक धर्माच्या १००० वर्ष आधी, हिंदू/वेदिक धर्म २५०० वर्षापूर्वी पासून अस्तित्वात आहे. रीग्वेदाची निर्मिती तर फक्त २५०० वर्षापूर्वीची आहे.
विठोबा हा गवळी-धनगरांनी कुळ-देवता आहे, तर बिरोबा हि मेश्पालक-धनगरांची कुळ-देवता आहे. विशेष म्हणजे विठ्ठल मंदिराचा जीर्नौद्धार यादव साम्राज्यातील विठ्ठल यादव या राजाने केला, (राजाचे हि नाव विठ्ठल नावावरून होते हे विशेष)
धनगर समाजामध्ये व्यक्ती पूजनाला महत्व आहे याचे ज्वलत उदाहरण आहे ते - परमपूज्य बाळूमामा धनगर, याच प्रकारे विठोबा आणि बिरोबाचे वेदात्तीकरण करण्यात आले. मुळात सर्व धनगर समाज हा शिव-भक्त असल्याकारणे पराक्रमी योध्याचे शंकराशी नाते समाजाने जोडले असावे,

८.उत्तर भारतात मध्ये मौर्य (पाल समाज- मेश्पालक)
मौर्य या पशुपालाकांची सत्ता तर सद्याचा भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान,नेपाल, बांग्लादेश,भूतान इतक्या मोठ्या प्रदेशावर होती.

९.भोज आणि शिलाहार वंश (गवळी/अहिर )- भोज आणि शिलाहार वंशाचे किल्ले हे अजून हि मजबूत आणि प्रक्षणीय आहेत. (उदाहर्णाथ-अजिंक्यतारा,प्रतापगड, कोल्हापूरचा -पन्हाळा,सोलापूरच्या-भूयीकोट किल्ला, सज्जन गड-सातारा)

प्रत्येक समाजाला उन्नती आणि अवनतीचे चक्र उपभोगावे लागते हे खरेच आहे. एक झापड येते आणि नाविण्याची हौस संपते. आहे तेच कसे सांभाळायचे, बदलांशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रश्नचिन्ह उभे रहाते. एखादे मल्हारराव, यशवंतराव वा साध्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई येतात...निर्मितीला चालना देतात...पण त्यातुन बोध मिळतोच असे होत नाही. काही लोक शिवरायांपारही काही इतिहास होता याकडे का वळत नाहीत याचे उत्तर खुप साधे आहे कारण त्यापलीकडे त्या समाजघटकाचा विशेष असा मुळात इतिहासच नाही. ते धनगरी सत्तांचे सरंजामदारीपद उपभोगत गेले आणि नंतर मुस्लिमांचे सरदार बनले हे एक वास्तव आहे. आणि ज्यांचा इतिहास आहे ते मात्र आजच्या सत्तेच्या राजकारणात प्यादे बनवले जात आहेत. जीवनाच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष त्यांना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आपल्याच उप-घटकांत...मग ते अहिर असोत कि अन्य कोणी...ऐक्य साधले जात नाहीय. 

मला एकच सांगायचे आहे...बाबांनो आपले पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली. त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत आहे...आणि तरीही आपण गप्प आहोत.

No comments:

Post a Comment